पुणे बहुजननामा : पुण्यामध्ये चालणाऱ्या स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या भारतीय तरुणी आणि थायलंड येथील तरुण मुली मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करतात हा व्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी राष्ट्रीय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण संघाचे अध्यक्ष सनी निम्हण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते गणेश भोकरे यांनी केली. सदर विषयासंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर येथे निवेदन देण्यात आले आहे.
पुण्यात मोठ्या संख्येने स्पा सेंटर व्यवसाय चालतो आणि या सेंटरला पुणेकरांची पसंती सुद्धा आहे परंतु स्पा सेंटरचा परवाना नसलेले 142 सेंटर पुण्यात आहेत. या स्पा सेंटरमध्ये भारतीय आणि थायलंड येथील तरुण मुली नोकरी करतात परंतू स्पाच्या नावाखाली या मुली चक्क वेश्या व्यवसाय करतात अशी माहिती राष्ट्रीय मानव अधिकार आणि अपराध नियंत्रण संघाचे अध्यक्ष सनी निम्हण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते गणेश भोकरे यांनी दिली.
विदेशातून आलेल्या मुली टुरिस्ट व्हिजा Employment Visa आणि Business Visa घेऊन भारतात प्रवेश करतात. स्पा सेंटर मध्ये काम करणाऱ्या सर्व मुलींची नोंद पोलीस चौकीला करणे कायद्याने अनिवार्य आहे आणि एफआरआरओ / सीओआयओ किंवा पोलीस उपायुक्त / जिल्हेच्या कार्यालयांमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे . परंतु स्पा सेंटर चालक कोणत्याही मुलीची नोंद यामधील कोणत्याही कार्यालयात करीत नाहीत. FRRO नियमाप्रमाणे जर कोणतीही व्यक्ती बाहेर देशातून आपल्या देशात येत असेल तर त्याला फॉर्म नंबर ‘सी’ आणि ‘ए’ हे दोन्ही फॉर्म 14 दिवसाच्या आत FRRO ऑफिस मध्ये द्यावे सादर करावे लागते. सदर FRRO चे ऑफिस मुंबई येथे आहे तरी सदरील मुलींनी FRRO चे फॉर्म भरलेले नसून ते बेकायदेशीरपणे पुण्यात राहतात. असेही त्यांनी यावेळी सांगितले.