नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थायलंडमध्ये नवी दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरातील २८ वर्षीय तरूणाचा रहस्यमय मृत्यू झाला आहे. सौरभ शर्मा नावाचा एक तरुण थायलंड (पट्टाया) येथे आपल्या मित्रांसह बॅचलर पार्टी करण्यास गेला होता. संशयास्पद परिस्थितीत तो एका स्विमिंग पूलमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सौरभच २१ नोव्हेंबरला लग्न होणार होते. त्याला प्रवास करण्याची आवड होती आणि तो दरवर्षी फिरायचा. यावेळी त्याने मित्रांसोबत थायलंडला जाण्याचा विचार केला आणि बुक केलेल्या हॉटेलवर पोहचला. काहीतरी खाल्ल्यानंतर सौरभ स्विमिंग करण्यासाठी गेला. स्विमिंग पूलमध्ये त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांला रुग्णालयात दाखल केले असता त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ३६ तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.
त्याचवेळी सौरभचे वडील महिपाल शर्मा यांनी हॉटेलमधून सीसीटीव्ही फुटेज मागितले असता हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यास नकार दिला. पोलिसांत तक्रार करूनही त्यांना कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, असा परिवारातील सदस्यांचा आरोप आहे. सौरभच्या कुटुंबाचा असा संशय आहे की त्याची हत्या केली गेली आहे.
सौरभचे वडील म्हणाले, पोलिसांनी मला सांगितले की सौरभचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तसे असल्यास त्याला उपचारासाठी रुग्णालयात का ठेवले गेले. रुग्णालयात जात असताना सौरभचा मृत्यू झाला असता, उपचारासाठी त्याला पैसे का द्यावे लागले, असा आरोप महिपाल यांनी केला आहे. ते म्हणाले की, जेव्हा आम्ही पोलिसांना सांगितले की, त्याने त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात १८ लाख रुपये दिले आहेत, तेव्हा पोलिसांनी त्यांचे म्हणणे बदलून सांगितले की, सौरभचा मृत्यू उपचारादरम्यान झाला.
नोव्हेंबरमध्ये सौरभ लग्न करणार होता आणि कुटुंबीय लग्नाची योजना आखत होते, असं कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे. एका क्षणात सर्व आनंद दु: खाच्या रूपात बदलला. १० वर्षांपूर्वी सौरभच्या आईचे निधन झाले आहे. तो वडिलांसोबतच राहत होता आणि त्याच्या दोन्ही बहिणी विवाहित आहेत. सौरभच्या वडिलांनी न्याय मिळावा आणि आपल्या मुलाच्या मृत्यूची योग्य चौकशी करण्याची मागणी करून गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.
Visit : bahujannama.com