नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसा भडकवण्याच्या आरोपात असलेले ‘आप’चे सस्पेंड नेते ताहीर हुसेन यांचे फोन कॉल डिटेल्स तपासले जात आहे. हिंसेच्या ३ दिवस अगोदरचे फोन कॉल डिटेल्सचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
रिपोर्टनुसार आपचे सस्पेंड नेते ताहीर हुसेन यांनी ३ दिवस अगोदरचे फोन कॉल तपासले असता त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अमानतुल्ला खान यांच्यासोबत बोलणे झाले असल्याचे समजले आहे.
अमानतुल्ला खान यांच्यासोबत ५६ वेळा बोलणे झाले असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना १८ वेळा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत ८ वेळा बोलणे झाले आहे.
उत्तर-पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे रविवारी सुरु झालेल्या हिंसेमुळे ४२ लोकांचा मृत्यू झाला असून दिल्ली पोलीस याचा तपास घेत आहेत.
नॉर्थ दिल्लीतील जातीय हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण १२३ एफआयआर नोंदवल्या असून सुमारे ६२३ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचाराच्या चार दिवसानंतर ईशान्य दिल्लीतील काही दंगलग्रस्त भागात दुकाने उघडली असून परिस्थिती सामान्य होत आहे.