नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वेळा नगरसेवक राहिलेले तसेच महानगरपालिकेच्या महत्वाच्या पदांवर काम केलेले राज खुराणा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. मंगळवारी मॉडेल टाऊन मधून ‘आप’चे आमदार अखिलेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मुख्यालयात पक्ष नेते संजय सिंह खुराणा यांनी त्यांना सदस्यत्व दिले.
दिल्लीतील गोरतलब या विधानसभा मतदार क्षेत्रातून कपिल मिश्रा यांना भाजपने उमेदवारी दिली असून राज खुराणा यांचे बीजेपीतून ‘आप’मध्ये जाणे हा पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे. यापूर्वीच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नेत्यांनी सोमवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. ‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी त्या सर्वांना पक्षाची टोपी घालून सर्वांचे स्वागत केले. पक्षात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये वाल्मिकी समाजाचे नेते रामनाथ यांचा समावेश असून ते ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि एसएससी आणि एसटी टास्क फोर्सच्या चेयरमन पदावर कार्यरत होते. त्याबरोबरच गोल मार्केट क्षेत्रातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९८९ मध्ये बावीस लाखांच्या निधीमधून प्राथमिक स्वरूपात यमुना नदीची साफसफाई रामनाथ यांनी केली हाती. तसेच भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष देवराज भडाना यांनीदेखील आम आदमी पक्षात प्रवेश केला. करावल मतदार संघातील ‘बीएसपी’चे विद्यमान उमेदवार नथुराम कश्यप यांनीही आप मध्ये प्रवेश केला आहे.
पक्षात प्रवेश केल्यानंतर भडाना म्हणाले की, दिल्लीमध्ये कित्येक वर्षे काँग्रेसचे सरकार होते. दिल्लीतील जनतेने काँग्रेस आणि भाजप या दोघांना सत्ता करण्यासाठी संधी दिली पण दोघांनीही दिल्लीतील मजूर वर्गाच्या उज्वल भविष्याचा कधीही विचार केला नाही. पहिल्यांदा असे सरकार आले आहे की, ज्या सरकारने अधिकतर मजूर वर्गासाठी कल्याणकारी काम केले आहे.