बहुजननामा ऑनलाइन – अन्याय, अत्याचार, बलात्कार अशा घटना आपल्याला रोजच ऐकायला भेटतात असच एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण नवी दिल्लीमध्ये उघडकीस आलं आहे. मित्राने बलात्कार केला म्हणून आपल्याला मूल झालं आणि नऊ महिन्यांआधीच मृत मुलाचा जन्म झाला. अशी तक्रार एका बलात्कार पीडितेने केली होती. या पीडितेची तक्रार नोंदवून हे प्रकरण कोर्टात गेलं आहे आणि कोर्टाने आता या मृत मुलाची DNA तपासणी करण्याचा आदेश पोलिसांना दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळे या मृत मुलाचे पार्थिव स्मशानभूमीतून काढून आता त्याची DNA तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान या पीडित महिलेच्या या तक्रारीमुळे पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत. ती पीडित महिला म्हणाली की, एका व्यक्तीने तिला लग्नाचं अमीष दाखवून लैंगिक संबंध ठेवले असा असा दावा या महिलेने केला आहे. तसेच यावर उत्तर देताना आम्ही लिव्ह इन मध्ये राहत होतो असा दावा आरोप असलेल्या या व्यक्तीने केला आहे.
त्याने ठेवलेल्या या लैंगिक संबंधामुळे गर्भवती राहिले असल्याचा दावा या महिलेने केला आहे. तसेच त्या व्यक्तीने तिला नंतर मारहाण करू लागल्याने मृत मुलाचा जन्म झाला असा आरोपही या महिलेने केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या तिसहजारी कोर्टाने या मृत मुलाच्या DNA टेस्टचे आदेश दिले. या महिलेचं लग्न झालं असून तिने आधीच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे का अशी विचारणा पोलिसांनी केली आहे.