नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉईज लॉकर रूम प्रकरणात दिल्ली पोलिसांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामकडून काही महत्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेल करत आहे, ज्यांनी ग्रुप चॅटच्या 27 सदस्यांची ओळख पटवली आहे. यापूर्वी ग्रुपच्या सात सदस्यांची ओळख खोटी माहिती आणि व्हर्च्युयल प्रायव्हेट नेटवर्कच्या वापरामुळे पटली नव्हती. दहा दिवसानंतर ग्रुपच्या चार प्रौढ सदस्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांनी सर्वांची ओळख सांगितली. परंतु, सात अन्य लोकांच्या बाबत ते माहिती देऊ शकले नाहीत. त्यांना हेदखील माहित नव्हते की या सातजणांना ग्रुपमध्ये कुणी सहभागी करून घेतले होते.
या आठवड्यात इन्स्टाग्रामने सबस्क्राईब संबंधित माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामने जी माहिती दिली आहे ती युजरने अकाऊंट तयार करताना दिलेली आहे. यासोबतच इन्टरनेट प्रोटोकॉल रिपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलीसांनी चॅट ग्रुपचा मजकुरसुद्धा देण्यास सांगितले आहे. ते सदस्यांकडून वायरल करण्यात आलेल्या फोटोंसह अन्य मजकूर मिळण्याची वाट पाहात आहेत. आता ओळख पटालेल्या सात लोकांपैकी दोघे एनसीआरच्या बाहेरील आहेत.
पोलिसांनी या मुलांशी फोनवरसुद्धा चर्चा केली आहे. त्यांना तपासासाठी सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीची तारीख लॉकडाऊनच्या निर्णयावर अवलंबून आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, स्नॅपचॅटचा स्क्रीनशॉट बॉईज लॉकर रूम प्रकरणासोबत मिसळला होता. तर बॉईज लॉकर रूमच्या सदस्यांनी आपल्या सहकार्यांच्या लैंगिक शोषणाची चर्चा केली नव्हती, परंतु आता त्यांच्यावर असे फोटो शेयर करण्याचा आरोप आहे, ज्यावर त्यांनी चर्चा केली आहे. यामध्ये बॉडी शेमिंग आणि मॉर्फ छायाचित्रांचा समावेश आहे. आतापर्यंत एका आरोपीला अटक केली आहे आणि एक अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले आहे.