नवी दिल्ली वृत्तसंस्था : दिल्लीच्या पटेल नगर परिसरात दोन गटांत झालेल्या मारामारीत एका युवकाची हत्या झाली असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात ६ जणांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मंगळवारी रात्री दोन गटांत एका विषयावर वाद सुरु होता . त्यानंतर वाद वाढल्याने गटातील काही मुलांनी ३ जणांवर हल्ला चढविला. ज्यामध्ये एका तरुणाची हत्या झाली , तर इतर दोन गंभीर जखमी झाले आहे. घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.
दिल्ली मध्ये दिवसेंदिवस या घटनांना ऊत आला आहे. नुकतीच दिल्लीतील एका युवकाने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनर ची हत्या केली, आपल्या पार्टनर चे इतर कोणासोबत संबंध असल्याच्या शंकेवरून आरोपीने तिची हत्या केली.