नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश कुमार याने दयेचा अर्ज काही दिवसांपूर्वी केला होता. पण दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी गुरुवारी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला असून आता निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तारीख ठरवण्यात आली आहे. सर्व दोषींची दया याचिका फेटाळून सत्र न्यायालयाने दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केले असून निर्भयाच्या चार आरोपींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi court issues fresh death warrant for convicts for 1st February, 6 am pic.twitter.com/hHvXo6Av1d
— ANI (@ANI) January 17, 2020
निर्भयावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली असून केवळ नियमांमुळे ही तारीख पुढे ढकलण्याची गरज असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच निर्भयाची आई अस्वस्थ आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘माझ्या मुलीवरील अत्याचार आणि मृत्यूचे राजकारण करू नका,’ अशी विनंतीही केली. निर्भयाची आई निर्भया प्रकरणावरून गुरुवारी भाजप आणि आपमध्ये झालेले आरोप-प्रत्यारोप पाहून दुखी झाली होती.