नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) लाच घेताना गोपाळ कृष्ण माधव नावाच्या व्यक्तीला रंगेहाथ पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे माजी विशेष अधिकारी (OSD ) असल्याचे सांगितले जात आहे. कर प्रकरण मिटविण्यासाठी गोपाळला दोन लाखांची लाच घेताना सीबीआयने पकडले आहे.
जीएसटी प्रकरणात गोपाळ कृष्ण माधव यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना ऑपरेशनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की गोपाळला अटक झाल्यानंतर लगेचच सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले, तेथे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
सिसोदिया यांच्यासहभागाबद्दल तपास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा सहभाग उघडकीस आला नसून तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की माधव २०१५ मध्ये सिसोदिया यांच्या कार्यालयात तैनात होता. त्याच बरोबर, सीबीआयने एका दिवसानंतर दिल्ली निवडणुकीसाठी मतदान होणार आहे अशा वेळी हे अटक केली आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. आता ८ फेब्रुवारीला जनता आपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान करणार आहे.अशा परिस्थितीत गुरुवारी निवडणूक प्रचाराच्या अगदी आधी दिल्लीकरांना वर्तमानपत्रासह एक पत्रक मिळाले, ज्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुस्लिमांचे मसीहा असे वर्णन केले गेले आणि त्यांना जाली टोपी घालतांना दाखवले गेले.