नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी दोन दिवस अगोदर अर्ज दाखल केले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. १५२८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १०४२ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून ४७३ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत तर १३ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
दिल्लीमध्ये नवी दिल्लीच्या जागेवर सर्वाधिक उमेदवारांनी म्हणजेच ८० जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्याच मतदार संघातून अरविंद केजरीवालही निवडणूक लढवत आहेत, अशी माहिती मिळत आहे. तसेच ५२ अर्ज फेटाळण्यात आले असून २८ अर्ज पात्र ठरवले गेले आहेत. स्वतः केजरीवाल यांना सहा तास वाट पाहावी लागली आहे. २४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.
दिल्ली निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक यादी सादर केली असून त्यात उमेदवारांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ती माहिती तुम्ही https://affidavit.eci.gov.in/ या ठिकणी पाहू शकता.
Visit : bahujannama.com