नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार जणांना उद्या शनिवारी १ फेब्रुवारीला फाशी होणार होती. पण आता आदेशानुसार या चार जणांना पुढील आदेशापर्यंत फाशी देऊ नये, अशी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने असे सांगितले असून उद्या सकाळी सहा वाजता होणारी फाशी टळली आहे.
तसेच पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असून त्यांची फाशी आता दुसऱ्यांदा पुढे ढकलली गेली आहे. याअगोदर आरोपींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्याचा आदेश होता. पण त्याही वेळी आरोपींची फाशी पुढे ढकलण्यात आली होती.
तर निर्भया प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याची फेरविचार याचिका आजच सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली असून घटना घडली तेव्हा तो अल्पवयीन होता, असा दावा पवनने केला होता. पण तो दावा सुप्रीम कोर्टाने अमान्य केला आहे.