नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – समाज माध्यमावर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. ज्या धर्मामध्ये स्वस्तिकच्या चिन्हाला पवित्र समजले जाते. त्या चिन्हाच्या मागे झाडू घेऊन धावताना व्यक्तीचे व्यंगचित्र दाखवले आहे.
भगवे कपडे धारण करून होळीच्या दिवशी एका मुस्लिम कुटुंबाच्या घरात शिरून मारहाण केली होती. अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कोण खतपाणी घालते असा सवाल करीत त्यांनी भाजपला जबाबदार धरले होते. त्याच झुंडशालीला विरोध म्हणून केरीवाल यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
हे छायाचित्रासोबत प्रसिद्ध करताना अरविंद केजरीवाल यांनी ‘हे कोणीतरी पाठवलं आहे’ असा संदेश देखील लिहिला आहे.त्यामळे जनतेत नाराजीचा सूर उमटला आहे.