नवी दिल्ली, वृत्तसंस्था – आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्याकडे त्यांची स्वतःची कार नव्हती, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मागील पाच वर्षात त्यांची संपत्ती वाढली नसून रिअल इस्टेटही २०१५ च्या तुलनेत समानच आहे. ही माहिती गुरुवारी पूर्व दिल्लीतील पडपडगंज येथील विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना दिली. सिसोदिया यांचं प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या पत्नीची मालमत्ता ६५ लाख रुपये इतकी असून २०१५ च्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकच मारुती सुझुकी असल्याचे म्हटले आहे. पण आता २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी वाहन संबंधित विवारणामध्ये शून्य असे लिहिले असून त्यांनी एकही वाहन नसल्याचे सांगितले आहे.
गुरुवारी त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे २०१८-२०१९ मध्ये ४,७४,८८८ रुपये संपत्ती होती. २०१३-२०१४ मध्ये त्यांच्याकडे ४,९२,६२४ इतकी जंगम मालमत्ता होती. २०१५ मध्ये सिसोदिया यांनी वसुंधरा भागात ५-७ लाख रुपये किंमतीची संपत्ती खरेदी केली होती, ज्याची किंमत बाजारात १२ लाख आहे. यावर्षीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मालमत्तेची माहिती दिली असून सध्याची मालमत्ता २१ लाखापर्यंत वाढली आहे.
सिसोदिया यांनी २०१५ मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीकडे मार्च २००८ मध्ये ८ लाख ७० हजार इतकी मालमत्ता खरेदी केली होती. ज्याची बाजारातील किंमत सुमारे २० लाख होती. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर २०१८ च्या जुलै मध्ये मयूर विहार फेज – १ या परिसरात ६५ लाखांची मालमत्ता खरेदी केली गेली आहे.