बहुजननामा ऑनलाइन – ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या दीपिका पादुकोण बद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अशी माहिती मिळाली आहे की, दीपिका पादुकोण त्या व्हाट्सएप ग्रुपची ऍडमिन होती, ज्यात ड्रग्जची मागणी केली जात होती. दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये त्या ग्रुपवर ड्रग्जची मागणी केली होती. असे सांगितले जात आहे की, जया शाह आणि करिश्मा देखील त्या ग्रुपवर हजर होत्या. अशा परिस्थितीत दीपिकाच्या अडचणी आता वाढू शकतात.
दीपिकाची अडचण वाढली
एनसीबीची चौकशी
दीपिका पादुकोणची शुक्रवारीच चौकशी होणार होती. पण नंतर तिला शनिवारी बोलावण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी फक्त रकुल प्रीत सिंह आणि करिश्मा यांचीच चौकशी केली जाईल. रकुलची दीर्घ काळापासून चौकशी सुरु आहे. तर करिश्माची देखील चौकशी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत हा वादही थांबणार नाही आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींवर एनसीबीची चौकशीही थांबणार नाही. एनसीबी दीपिकाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारणार असल्याचेही सांगितले जात आहे. एक यादी तयार केली गेली आहे आणि त्या आधारावरच तिची चौकशी केली जाईल. दीपिकाशिवाय सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही एनसीबी चौकशी करणार आहे. त्यांनाही २६ तारखेला समन्स दिले गेले आहे.