मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Deepak Kesarkar | गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्युत्तर देणार नाही’, असं केसरकर म्हणाले. या विधानामुळे सर्वत्र राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Congress) जवळचा आहे असे वाटत असेल, पण हा भ्रम नक्की दूर होईल. जोपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रत्युत्तर देणार नाही,” असं देखील दीपक केसकरांनी (Deepak Kesarkar) स्पष्ट केलं आहे.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले, “एकनाथ शिंदेविरोधात करण्यात आलेली कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही. याबाबत शिवसेनेला रीतसर उत्तर पाठवण्यात येईल, तसेच एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याबाबतचं पाठवलेलं पत्र बेकायदेशीर आहे. याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ.”
दरम्यान, “पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नाही तर प्रेमाचं बंधन महत्वाचं आहे.
शिवबंधन हे प्रेमाचं बंधन आहे आणि आजही आमच्या हातात शिवबंधन आहे.
बाळासाहेबांच्या आठवणीत आम्ही हे शिवबंधन घालतो.
आम्ही खरे शिवसैनिक असल्याचं,” देखील केसरकर यांनी सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Deepak Kesarkar | MLA deepak kesarkar on shiv sena chief uddhav thackeray
हे देखील वाचा :
Pune Crime | जबरी चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त