Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले

 Deepak Kesarkar | minister deepak kesarkar has reacted on the allocation of lok sabha seats

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) निर्णय दिल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 100 टक्के होणार आहे. मंत्रीपदाचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करणार आहेत, असं मोठं विधान दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या आधी होईल असंही त्यांनी म्हटलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल?

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावर प्रतिक्रिया दिली. शिंदे गट (Shinde Group) 22 तर भाजप (BJP) 26 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत केसरकर यांना विचारले असता लोकसभेची तयारी सर्वांनी सुरु केली आहे. एखाद्या निवडणुकीची तयारी सुरु झाली की राष्ट्रीय नेते एकत्र येतात. त्यामुळे हा सगळा विषय वरिष्ठांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तसेच लोकसभेसाठी भाजप नेहमीच जास्त जागा घेत आलेले आहे. कारण ते केंद्रात असतात सेना राज्यात काम करते.
मात्र, आमच्या वाट्याला ज्या जागा नेहमी येतात त्या जागांवर आम्ही तयारी सुरु केली आहे.
त्यामध्ये चुकीचं काहीही नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.

 

 

विरोधकांनी प्रोटोकॉल लक्षात घ्यावे

नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.
यावरुन दीपक केसरकर यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांनी आधी साधा प्रोटोकॉल लक्षात घ्यावा.
एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे आणि बोलायचे हे विरोधक करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :  Deepak Kesarkar | minister deepak kesarkar has reacted on the allocation of lok sabha seats

 

हे देखील वाचा :

New Parliament Building | नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीच करणार!, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Pune Chandni Chowk News | चांदणी चौकाची वाहतूक कोंडी कमी होणार; गडकरींचे आदेश, येत्या १५ जुलैला प्रकल्पाचे उद्घाटन

Pune Ring Road Land Acquisition | रिंग रोड प्रकल्पग्रस्तांची भूसंपादन प्रक्रिया जूनअखेरीस सुरु; मिळणार फेरमूल्यांकनानुसार मोबदला

Radhakrishna Vikhe Patil | ‘बाहेरून कीर्तन आतून तमाशा’, केजरीवाल यांच्या भेटीवर विखे पाटलांची विरोधकांवर टीका