‘डेक्कन क्वीन’ ही एक्स्प्रेस (Deccan Queen Express) लवकरच नव्या रूपात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने या एक्स्प्रेसला सामान्य डब्याचा रंग न देता हिरवा आणि लाल रंग दिला गेला आहे. ‘डेक्कन क्वीन’ ही हेरिटेज रेल्वे असल्याने अहमदाबाद येथील ‘NID’ने याचे आरेखन केले आहे. चेन्नई येथील कारखान्यात डेक्कन क्वीनचे डबे व डायनिंग कार तयार झाली आहे. तसेच आतापर्यंत 18 डब्यांची निर्मिती पूर्ण झालीय. परंतु, डबे अजुन मुंबईत दाखल झाले नाही. असं रेल्वे विभागाच्या (Railway Department) सुत्राकडून सांगण्यात आलेय. यामुळे डेक्कन क्वीन’चा प्रवास आता जलद आणि सुरक्षित होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, या डब्यांच्या बदलांबाबत प्रवाशांनी काही सूचना रेल्वेला केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने त्या मान्य केल्या नाहीत. तर, या बदलांचे आनंदाने स्वागत केले जाणार आहे. नावलौकीक असलेल्या रेल्वेच्या नवीन कोचचे उद्घाटन पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करावे, अशी मागणीही रेल्वेकडे केली गेली आहे. असं रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा हर्षा शहा (Harsha Shah) यांनी सांगितलं आहे.
हे आहेत नवे नियम –
– नव्या रूपातील डब्यांना आता हिरव्या व लाल रंगाचा साज
– डायनिंग कारची क्षमता 32 ऐवजी आता 40 प्रवाशांची
– 5 रंगांमधील रंगसंगती असलेली ही देशातील एकमेव गाडी
– वेग वाढविण्यासाठी ‘LHB’ डबे बसविण्याचा निर्णय
– या डब्यांमध्ये प्रशस्त जागा असून ते वजनानेही हलके