मीरा रोड / वसई : बहुजननामा ऑनलाईन – एका 37 वर्षीय महिलेने आपल्या 16 वर्षांच्या सख्ख्या भाचीचा (Niece) एका रात्रीसाठी (For a night) साडेचार लाख रुपयांचा (deal for 4.5 lakhs) सौदा केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड (Meera Road) येथून समोर आली आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सौदा फसला अन् आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहाथ अटक Arrested केली. दरम्यान पोलिसांनी 16 वर्षीय पीडित मुलीची सुखरुप सुटका केली आहे. आरोपी महिला पूर्वाश्रमीची बारबाला असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
प्राप्त माहितीनुसार, मीरा रोड येथे राहणारी एक महिला आपल्या 16 वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायासाठी (Minor girl in Prostitution) घेऊन येणार आहे. तसेच तसेच पीडीत मुलीचा एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा केल्याची माहिती बेकायदेशीर मानवी तस्करी शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने एका स्वयंसेवी महिलेच्या मदतीने आरोपी महिलेशी संपर्क साधला.
तसेच पोलिसांनी बनावट ग्राहकही तयार केले.
मुंबई-अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये हा व्यवहार ठरला.
यानंतर आरोपी महिला अल्पवयीन मुलीला ठरलेल्या ठिकाणी घेऊन आली.
या ठिकाणी आधीपासून सापळा रचलेल्या पोलिसांनी आरोपी महिलेला रंगेहाथ अटक Arrested केली. तसेच पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
Web Titel : deal for one night former bar dancer arrested for selling 16 year old niece to four and half lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Navi Mumbai | नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज विशाल मोर्चा