बहुजननामा ऑनलाईन टीम – पोलिसांना वरळी ( worli) परिसरामध्ये एका 44 वर्षीय महिलेचा मृतदेह ( dead body) आढळला असून मृतदेहाच्या गळ्याभोवती व्रण असल्याचे दिसले आहे. त्यामुळे या महिलेचा हत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे. हि घटना शुक्रवारी उघडकीस आलीय.
शिखा नारायण मंडल असे या मृत महिलेचे नाव असून वरळीच्या जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
वरळी परिसरातील जी बी खेर मार्गावरील तात्पुरत्या लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये शिखा ह्या राहत होत्या. गुरूवारी रात्री शिबु भौमिक याच्यासोबत तिला शेवटचे अनेकांनी पाहिले आहे, असे समोर आलंय. त्यानंतर गुरूवारी सायंकाळी शिखा रक्ताच्या थारोळ्यात लेबर कॅम्पच्या पत्र्याच्या कंम्पाऊडमध्ये आढळल्या. याची माहिती स्थानिकांनी पोलीस कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी वरळी पोलिसांचे पथक दाखल झाले.
शिखाच्या गळ्याभोवती एक व्रण आढळले आहेत. तसेच तिच्या नाकावर आणि कपाळावर हत्याराने वार केल्याचे हि दिसून आले आहे. शिखाला तातडीने नायर रुग्णालयात नेले मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शिखाच्या हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी संशयित आरोपी शिबु भौमिक विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.