DCP Vivek Masal | विवेक मासाळ सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी

August 10, 2024

पुणे : DCP Vivek Masal | गडचिरोली येथील एसआरपीएफचे समादेशक विवेक मासाळ यांची पुणे शहर पोलीस दलात (Pune Police) बदली झाली असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी त्यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. (DCP EoW & Cyber Pune)

परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे (Nanded ACB SP) पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे (DCP Rajkumar Shinde) यांची विशेष शाखेचे पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.