DCP Amol Zende At Bhau Rangari Ganpati | पुणे : वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

पुणे: DCP Amol Zende At Bhau Rangari Ganpati | शहरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. त्यामुळे शहरात गर्दी वाढत आहे. दरम्यान, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Traffic Amol Zende) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्टच्या बाप्पाच्या दर्शनाला केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलीवूड स्टार्स, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, राजकीय नेते, मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर अनेक बडे सेलिब्रिटीही दर्शनासाठी पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याकडून पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो.

https://www.instagram.com/p/C_2XL22pG8D/

त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची उपस्थिती आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पाच्या दर्शनाला गर्दी वाढताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/C_0ni1bJ6f1/