मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा जुना साथीदार गुंड तारिक परवीनला अटक करण्यात आली आहे. डॉन दाऊदच्या व्यवहारांचे व्यवस्थापन परवीन करत असल्याची चर्चा आहे त्यामुळे त्याची अटक ही महत्वाची मानली जात आहे. त्याच्या अटकेमुळे डी कंपनी विषयी अनेक महत्वपूर्ण हालचालींची माहिती मिळण्याची शक्यता आहे.खंडणी विरोधी पथकाकडून कारवाई करीत त्याला अटक करण्यात आली आहे.
अशी झाली अटक
एका व्यापाऱ्याकडून खंडणी मगितल्याप्रकरणी परवीनला अटक करण्यात आली आहे. ३ लाखांची खंडणी घेऊन देखील तो व्यापाऱ्याला त्रास देत होता. मात्र, लकडावालच्या अटकेनंतर परवीनचे बिंग फुटले. एजाज लकडावालाच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीतून ही कारवाई करण्यात आली. तारिक परवीन हा अटक आरोपी एजाज लकड़ावालासाठी काम करत होता. याआधी तारिक परवीन हा तुरुंगात देखील होता. नंतर जामिनावर त्याची सुटका झाली होती. परवीन व्यतिरिक्त गॅंगस्टर एजाज लकडावालाचा हस्तक सलीम फर्निचरवाला उर्फ महाराजलाही याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आरोपींनी क्रॉफर्ड मार्केट येथील सुका मेवा विक्रेत्याकडे खंडणी मागितली होती. परवीनने तक्रारदाराकडून ३ लाख रुपये घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. त्यानंतर डोंगरी परिसरातून परवीनला अटक करण्यात आली. २०१८ मध्ये परवीनला ठाणे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती.
परवीनच्या मुलीलाही अटक
दाऊदचा हस्तक कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बिहार, पाटणा विमानतळावरून जानेवारीमध्ये अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. यापकरणी त्याची चौकशी सुरु असताना त्याच्या मुलीला देखील खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच खंडणीच्या या प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार महाराजालाही याप्रकरणी अटक करण्यात आली.