बहुजननामा ऑनलाईन – भाजपच्या वरिष्ठ नेत्या माजी परराष्ट्रमंत्री या अनंतात विलीन झाल्या आहेत. त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते. त्यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यात फक्त नेते मंडळीच नाहीतर त्यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी स्वराज अधिक भावूक झाले होते. सुषमा स्वराज यांना तिरंग्यात पाहून दोघांनी त्यांच्या पार्थिवाला सलाम ठोकला.
दरम्यान सुषमा यांच्या अंत्यविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तेथे उपस्थीत राहून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नवी दिल्ली मधील एम्स रुग्णालयात सुषमा स्वराज यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मंगळवारी घाबरल्यासारखे होत होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्या उपचारासाठी लागली होती. मात्र त्यांना सुषमा स्वराज यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. त्यांची निधनाची बातमी ऐकूण तेथील डॉक्टरांनाही आपले अश्रू अनावर झाले होते.
Bansuri Swaraj and Swaraj Kaushal, daughter and husband of former External Affairs Minister #SushmaSwaraj, pay salute as state honours are accorded to her pic.twitter.com/cbQqvsm9G3
— ANI (@ANI) August 7, 2019