नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dance video viral | अनेकांचे सोशल मीडिया (Social media) हे जवळच झालं आहे. आपली प्रसिद्धी व्हावी यासाठी लोक अनेक प्रकारे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. मात्र, आता एक अजब व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेनं चक्क आपल्या अल्पवयीन मुलासोबतच हॉट फोटो (Hot photo) समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. तर त्या महिलेने फक्त सोशल मीडियावर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी असा व्हिडिओ शेअर केला आहे. माय-लेकराच्या नात्याला काळिमा फासणारा हा व्हिडिओ (Dance Video Viral) सर्वत्र व्हायरल होत आहे. या अजब व्हिडिओवरून आता दिल्ली महिला आयोगाच्या (Women’s Commission) अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी या महिलेला नोटीस जारी केलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘या व्हिडिओवरून अनेक जणांनी या महिलेला ट्रोल केलं आहे. तर, महिला आयोगाने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश देखील दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी संबंधित महिला आणि त्यांच्या मुलाचे 4 फोटो ब्लर करुन सोशल मीडियावर शेअर केलेत. या महिलेला इन्स्टाग्रामवर (Instagram) 1.60 लाख फॉलोवर्स देखील आहेत. तसेच, याच महिलेनं मागील दिवसांपूर्वी आपल्या मुलासोबत अश्लील गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. परंतु, टीका झाल्यानंतर तो व्हिडिओ डिलिट देखील केला गेला.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी या महिलेची ओळख सांगितली नाही. मात्र, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे सांगितले आहे. तसेच, ‘लहान मुलाला महिलेकडून चुकीची शिकवण देण्यात येत आहे. आत्ताच ही महिला आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासत आहे, जेव्हा हा मुलगा मोठा होईल, तेव्हा तो आपल्या आईकडे कुठल्या नजरेतून पाहिल, असा प्रश्न तक्रारीत विचारण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार असाच घडत राहिला, तर भविष्यात मुलाची मानसिकता गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे जाईल. म्हणून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करुन, मुलाचे समुपदेशन करावे, असं स्वाती मालीवाल यांनी सांगितलं आहे.
या दरम्यान, महिला आयोग (Women’s Commission) हे महिलांच्या संरक्षणासाठीच हा आहे. सोशल मीडियातून अनेक महिला आपली कला सादर करतात. परंतु, ज्या महिलांकडून असे सामाजिक वातावरण दूषित करणारे कृत्य घडत असेल, त्यांना वठणीवर आणणे गरजेचं आहे. तसेच, सोशल मीडियावरील ते व्हिडिओ तात्काळ हटविण्याचे देखील स्वाती मालीवाल यांनी सांगितलं आहे.
Web Title :- dance video viral mother and sons relationship was slandered woman did obscene dance boy viral video swati mahiwal
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update