बहुजननामा ऑनलाइन टीम – आपल्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी काहीजण आपल्या दोन चाकी किंवा चार चाकीस विशिष्ठ प्रकारचे सायरन लावतात, जेणेकरून आपल्या गाडीच्या आसपास कोणी नुकसान करण्यास आला, तर लगेच त्याच्या शोध लागेल. पण त्याच गाडीच्या सायरनवर एक गली बॉय चक्क डान्स करतानाचा मजेशीर विडिओ सध्या सोशल मीडिया वर वायरल होत आहे. सोशल मीडिया वर ह्या विडिओला प्रचंड लाईक्स, आणि कंमेंट्स पडत आहेत.
Oh man, this has to be the coolest thing I’ve seen in a long time. I’m still on the floor laughing. My weekend has begun… pic.twitter.com/eYC4MKXRDk
— anand mahindra (@anandmahindra) August 9, 2019
वास्तविक ह्या विडिओ मध्ये एक लहान मुलगा घरासाठी लागणारे काही सामान घेऊन असतो. त्यानंतर तो एका गाडी थांबतो आणि त्या गाडीला लाथ मारतो. गाडीला लाथ मारताच गाडीचा सायरन वाजू लागतो. त्यानंतर हा विडिओ अत्यंत मजेशीर आहे. बाईक च्या सायरन च्या आवाजावर तो डान्स करू लागतो, प्रत्येक वेळी बदलणाऱ्या संगीताप्रमाणे तो त्याच्या स्टेप्स बदलतो आणि त्याचा तो डान्स बघण्यासारखा आहे, त्याच्या स्टेप्स प्रमाणे तो त्याच्या चेहऱ्याचे हावभाव देखील बदलतात.
सोशल मीडिया वर ह्या विडिओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३५ मिनिटांच्या हा विडिओ जास्त प्रमाणात शेअर केला जात आहे. एवढेच काय तर प्रसिद्ध बिजनेस मॅन आनंद महिंद्रा ने देखील ट्विट वर हा विडिओ शेअर केला आहे.