नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Damage Notes Exchange | अनेक वेळा अनेकजणांकडे फाटलेल्या नोटा असतात नाहीतर अनेक जणांना एटीएममधून पैसे काढताना एखाद्या वेळेस फाटक्या नोटा देखील मिळतात. दरम्यान तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील अथवा कुठेही या नोटा घेत नसेल कारण फाटलेल्या नोटा घेण्यास दुकानदार देखील नाही म्हणतो. पण काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण अशा फाटलेल्या नोटांऐवजी चांगली नोट मिळू शकते. आरबीआयच्या (RBI) नियमानुसार याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Damage Notes Exchange)
आरबीआयच्या 2017 च्या एक्सचेंज करेंसी नोट नियमांनुसार, जर एटीएममधून तुम्हाला फाटलेल्या नोटा मिळाल्या असतील तर त्या तुम्ही सहजपणे बदलू शकता. कुठलीही सरकारी बँक नोटा बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. अशा नोटा बँकेला बदलून द्याव्या लागतात. त्यास मनाई करु शकत नाहीत. असं बॅकेनं म्हटलं आहे. (Damage Notes Exchange)
नोट बदलण्याची प्रक्रिया काय आहे?
समजा ज्या व्यक्तिकडे नोटांचे तुकडे असतील तरी देखील बँक बदलून देईल. फाटलेल्या नोटेचा तुकडा गायब झाला असेल तरी एक्सचेंज होऊ शकणार आहे. जर कुठलीही नोट पूर्णपणे फाटली असेल, नोटाचा संपूर्ण भाग कट झाला असेल किंवा नोट जळाली असेल तर केवळ आरबीआयच्या ऑफिसमध्ये ती बदलली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरुन सरकारी बँक, खासगी बँकेच्या करंसी चेस्ट किंवा आरबीआय इश्यू ऑफिसमध्ये जाऊ बदलता येऊ शकणार आहे.
पैसे रिटर्न मिळणार –
नोट हलकीशी फाटलेली असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील. पण, नोट अधिक फाटली असेल तर काही टक्केच पैसे परत मिळतील. समजा 50 रुपयांहून कमी व्हॅल्यू असलेल्या नोटेचा मोठा तुकडा 50 टक्क्याहून जादा असेल तर त्या नोटेचे पूर्ण पैसे परत मिळतील. जर 50 रुपयांहून जादा व्हॅल्यू असलेल्या नोटेचा सर्वात मोठा तुलनेने 80 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला नोट बदलल्यानंतर पूर्ण पैसे मिळणार आहेत.”
समजा जर 50 रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा सामान्य नोटेच्या 40 ते 80 टक्क्यामध्ये असेल तर तुम्हाला त्या नोटेच्या निम्मे मूल्य मिळेल. जर एकाच नोटेचे 2 तुकडे असतील ज्याचे मूल्य 50 रुपयांपेक्षा अधिक असेल आणि हे 2 तुकडे सामान्य नोटेच्या 40 टक्क्यांपर्यंत असतील तर तुम्हाला नोटेच्या पूर्ण मूल्याच्या बरोबरीचे मूल्य मिळेल. 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 20 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात अर्धी किंमत मिळणार नाही.
अशी करा तक्रार –
– तुम्ही https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category वर तक्रार करू शकता.
– ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम साठी आहे.
– कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही.
– असं असताना बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.
– ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारे बँकेला 10 हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते.”
Web Title :- Damage Notes Exchange | know about rbi rules for damaged notes exchange marathi news