अहमदाबाद : वृत्तसंस्था – अरावली जिल्ह्यात मोदसा तालुक्यात एका दलित विद्यार्थिनीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या दलित विद्यार्थिनीला नराधमांनी घसपट नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला फासावर लटकावले. ही बाब शवविच्छेदनाच्या दुसऱ्या अहवालात समोर आली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांनीदेखील याला दुजोरा देत मुलीच्या अंगावर जखमा असून तिला जबरदस्तीने घसपटत नेले, असा अंदाज व्यक्त केला आहे. ५ जानेवारी रोजी या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला असून बलात्कार करणाऱ्यांनी अतिशय क्रूरपणे तिच्यावर अत्याचार केला असल्याचे शवविच्छेदनात नमूद केले आहे. विद्यार्थिनीच्या गुदद्वारात जखमा झाल्या असून गुदद्वाराचा शरीरातील एक भाग शरीराबाहेर आला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. इतकेच नाही तर तिला बळजबरीने फासावर लटकवण्यात आले असून तिच्या गळ्यावरील जखमांवरून आढळून येत असल्याचेही अहवालात सांगितले आहे. दुसऱ्या अहवालामुळे पहिल्या अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित करत मुलीवर बलात्कार अथवा हत्या झाली नसल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी बिमल धारवाड आणि त्याचे मित्र दर्शन भारवाड, सतीश भारवाड आणि जिगरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण यातील तिघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सतीश भारवाड मात्र फरार आहे. एकीकडे पोलिसांनी या प्रकरणात पूर्णपणे लक्ष दिला नसल्याचे येथील स्थानिकांनी केला होता. १ जानेवारीला मुलगी बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी तिच्या कुटुंबायांची तक्रार नोंदवण्यास नकार दिला. नंतर तिचा मृतदेह सापडल्यावर स्थानिकांनी मोठे आंदोलन केले होते.