मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Cyrus Mistry | टाटा सन्सचे (Tata Sons) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई पोलिसही मिस्त्री यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. महाराष्ट्रातील पालघर पोलिसांनी कार कंपनीला अनेक प्रश्न विचारले आहेत. सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जर्मनीला पाठवणार चिप
सर्व प्रश्नांची उत्तरे कार कंपनीची टीम आपल्या रिपोर्टमध्ये देईल. कार कंपनीने पालघर पोलिसांना सांगितले आहे की गाडीची डेटा रेकॉर्डर चिप जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. जर्मनीमधून डीकोड केल्यानंतर एसयूव्हीबद्दल अधिक तपशील उपलब्ध होतील. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता? अपघाताच्या वेळी ब्रेक, एअर बॅग आणि इतर भाग कसे काम करत होते? चिप डीकोड केल्यानंतर ही सर्व माहिती उपलब्ध होईल. (Cyrus Mistry)
वेळेचे गणित आणि विविध सीसीटीव्हीच्या फुटेजवरून गाडीचा वेग कळणार आहे. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, हे डाटा रेकॉर्डरवरून कळेल.
अनेक पैलूंचा तपास करत आहेत पोलीस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायरस मिस्त्री इतरांसोबत रविवारी दुपारी 1.25 वाजता उदवाडावरुन निघाले होते. त्यांच्या कारला 2.28 च्या सुमारास अपघात झाला. यावरून समजते की त्यांनी सुमारे 60 ते 65 किलोमीटरचे अंतर 1 तास 2 मिनिटांत कापले. मिस्त्री यांची गाडी वाटेत थांबली होती की गाडी भरधाव वेगाने जात होती, याचाही तपास पोलीस करत आहेत.
Web Title :- Cyrus Mistry | cyrus mistry accident chip sent to germany police ask car questions from manufacturer
हे देखील वाचा :