नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cyber Fraud | देशात सायबर फ्रॉड (Cyber Fraud) ची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हा फ्रॉड नवीन पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत सायबर गुन्हेगारांनी कोरोनाच्या बूस्टर डोस (Booster Dose) च्या नावावर फसवणूक सुरू केली आहे. (Cyber Fraud)
सायबर गुन्हेगारांनी बूस्टर डोस देण्याच्या नावावर लोकांना फसवण्याचे काम सुरू केले आहे. ते कॉल करून बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या बहाण्याने लोकांना ओटीपी नंबर विचारतात आणि त्याद्वारे त्यांचे बँक अकाऊंट रिकामे करतात. (Cyber Fraud)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशी करत आहेत फसवणूक
– कॉल येईल आणि सायबर गुन्हेगार विचारेल – तुम्ही व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत का?
– तुम्ही म्हणाल – होय
– सायबर गुन्हेगार – सर तुम्हाला बूस्टर डोस द्यावा लागणार आहे. मी तुमचे रजिस्ट्रेशन करत आहे. ओटीपी येईल, तो सांगा.
– तुम्ही ओटीपी सांगताच तुमचे बँक अकाऊंट रिकामे होईल, सर्व पैसे सायबर गुन्हेगार गायब करतील.
Web Title :- Cyber Fraud | alert cyber fraud over covid booster dose to siphon off money.