नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सायनाईड’च्या नावाने देशात ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात मोहनला १९व्या बलात्कार खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मिळाली असून तो महिलांचा बलात्कार करून नंतर मारून टाकत असे. आतापर्यंत त्याने २० महिलांना रेप करून मारले आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार मोहनची भेट २३ वर्षीय मुलीशी मंगुळुरुच्या CAMPCO युनिटमध्ये कामाच्या संदर्भात झाली होती. काही भेटीनंतर त्यांच्यात मैत्रीही झाली. मैत्री आणखी वाढल्यावर मोहनने त्या मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर दोघेही २ जानेवारी २००६ ला म्हैसूर मध्ये बस स्टँड जवळच्या एका लॉजमध्ये थांबले होते.
रात्री त्यांनी एकमेकांसोबत संबंध ठेवल्यावर त्याने मुलीचे सगळे दागिने उतरवून लॉजमध्ये ठेवून घेतले आणि फिरण्यासाठी बस स्टॅण्डवर आले. तेव्हा मोहनने त्या मुलीला गर्भवती न राहण्यासाठी सायनाईडयुक्त गोळी खायला दिली.
मुलीने गोळी खाल्ल्यावर लगेच बाथरूमच्या दिशेने धावत गेली आणि तिथेच पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता मृत घोषित केले गेले. दरम्यान मोहनने लॉजवर येऊन सगळे दागिने घेऊन फरार झाला. यानंतर मोहनने २००९ मध्ये कर्नाटकच्या बंतवाल मध्ये २०व्या महिलेला रेप करून सायनाईड खायला घालून मारल्यानंतर मोहनला अटक केले गेले.