बहुजननामा ऑनलाइन टीम – कोणताही पदार्थ चटकदार आणि आणखी चवदार करायचा असेल तर त्यात कढीपत्ता curry leaves() घातला जातो किंवा त्याची फोडणी दिली जाते. चवीसाठी वापरला जाणारा हा कढीपत्ता ( curry leaves) आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
कढीपत्त्याचे आपल्या शरीसासाठी अनेक गुणकारी फायदे होतात. याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. आज आपण कढीपत्ता खाण्याचे शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती जाणून घेणार आहोत.
कढीपत्ता खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) भूक लागत नसेल तर आहाारत कढीपत्त्याच्या पानांचा समावेश करावा. यामुळं भूक वाढण्यास मदत होते.
2) पोटात येणारा मुरडा थांबतो.
3) पोटात जंत झाले असतील तर यावर कढीपत्ता गुणकारी आहे.
4) मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यायल्यास रक्त पडण्याचं थांबतं.
5) हिरड्या मजबूत होतात.
6) एखाद्या कीटकानं चावल्यानंतर सूज आली असेल तर त्यावर कढीपत्त्याची पानं वाटून लाावावीत. फायदा मिळेल.
7) जखमी लवकर भरून निघण्यास मदत होते.
8) शरीरावर खाज येत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा लेप लावावा. आराम मिळेल.
9) रक्त शुद्ध होते.
10) केस गळती, केसात कोंडा यावर कढीपत्ता जास्त फायदेशीर ठरतो.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.