Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी
पुणे : Cultural Department Maharashtra | विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) भरघोस यश मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने (Ajit Pawar NCP) आपल्या मंत्र्यांकडे राज्याचे सांस्कृतिक मंत्रिपद घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे माजी राज्य संघटक,सप्तसूर म्युझिक कंपनीचे मालक मंगेश मोरे (Mangesh More) यांनी कलावंतच्या वतीने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे केली आहे.
मंगेश मोरे यांनी नुकतीच मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवाजीराव गर्जें यांची अनुक्रमे देवगिरी बंगला आणि पक्ष कार्यालयात भेट घेऊन निवडणूकीत मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विषयी बोलताना मोरे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक खाते राष्ट्रवादीकडे घ्यावे अशी सांस्कृतिक सेल मधील कलावंताची भावना आहे, राज्यातील कलावंत, साहित्यिक यांच्या हितासाठी अधिक चांगले निर्णय घेण्याची क्षमता पक्षाकडे असल्याचे कलावंत, रंगकर्मी यांना वाटते यामुळे आम्ही ही मागणी नेतृत्वाकडे केली आहे.
Comments are closed.