Cryptocurrency मध्ये गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या कशी बाळगावी सावधगिरी

  Cryptocurrency | investing in cryptocurrency know other important things

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency | बिटक्वाईन (BitCoin) किंवा इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः तरुण लोक मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, आपल्या देशात अजूनही क्रिप्टोकरन्सीबाबत धोरणात्मक अनिश्चितता आहे. (Cryptocurrency)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गुंतवणुकदाराने त्याच्या पोर्टफोलिओमध्ये किती क्रिप्टो ठेवावे हे ठरवणे महत्त्वाचे आहे. तज्ञ सांगतात की, सद्यस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 5-10% क्रिप्टो ठेवावे. तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना संपूर्ण पैसे गमावण्याच्या जोखमीवरच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

 

सरकारचे धोरण आल्यानंतर क्रिप्टोमधील गुंतवणुकीची स्थिती अधिक स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मोदी सरकार हिवाळी अधिवेशनातच क्रिप्टोकरन्सीसंदर्भात एक विधेयक आणणार होते. परंतु माहितीनुसार, सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टो एक्सचेंजचे नियमन करण्यासाठी विधेयक आणू शकते. (Cryptocurrency)

 

 

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पहिल्यांदा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना, ब्लू चिप क्रिप्टो असेटवर विचार केला पाहिजे. यांचे मार्केट कॅप जास्त असते म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार क्रिप्टो होल्डिंग्सची विक्री करतील तेव्हा त्यांना त्यांचे ग्राहक सहज मिळतील.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गुंतवणूकदारांनी Reddit, Twitter आणि इतर प्रोत्साहन देणार्‍या सोशल मीडियाच्या सल्ल्याने क्रिप्टो खरेदी-विक्रीचे निर्णय घेऊ नये.

गुंतवणूक करण्यापूर्वी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक का करावी याचे उत्तर शोधावे. फायद्यासाठी तत्काळ गुंतवणूक करायची असेल तर तोटा होण्याची शक्यता वाढते.

तज्ञ गुंतवणूकदारांना क्रिप्टोमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

सुरुवातीला 2-5 टक्के भांडवलाने सुरुवात करून नंतर नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विश्वसनीय एक्सचेंज निवडा. विश्वसनीय एक्सचेंज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर योग्य तपासणी करूनच कॉईनचे लिस्टींग करतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा धोका कमी होतो.

गुंतवणुकदारांनी क्रिप्टो अ‍ॅसेटमध्ये उपलब्ध टोकन मर्यादा देखील पाहावी. बिटकॉइन सारख्या अनेक क्रिप्टो असेटप्रमाणे, पुरवठा मर्यादित आहे परंतु Dogecoin ला कमाल मर्यादा नाही.

गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणूकदारांनी कॉईनचा पुरवठा, त्याची विश्वासार्हता आणि त्याचे संस्थापक यांचाही विचार केला पाहिजे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

क्रिप्टोकरन्सी कुठे ठेवायची?

तुम्ही दीर्घकाळ क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्यास, तुम्ही तुमची क्रिप्टो मालमत्ता साठवण्यासाठी हार्डवेअर असेटचा विचार केला पाहिजे. मात्र, जर तुम्ही अल्प मुदतीसाठी किंवा अल्प भांडवलाची गुंतवणूक करत असाल तर विश्वासार्ह एक्सचेंज हा एक चांगला पर्याय असेल.

 

जर पोर्टफोलिओ लहान असेल तर क्रिप्टो असेट एक्सचेंज वॉलेटमधून हार्डवेअर वॉलेटमध्ये ट्रान्सफरची गरज नाही
कारण या हस्तांतरणासाठी काही शुल्कदेखील द्यावे लागते.
मात्र, जर क्रिप्टोमध्ये गुंतवलेले भांडवल जास्त असेल तर ते हस्तांतरित करणे चांगले आहे.
एका वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ठराविक व्यवहार शुल्क आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Cryptocurrency | investing in cryptocurrency know other important things

 

हे देखील वाचा :

Diabetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Diwali 2022 | पुणेकरांनो बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम, दिवाळीत 10 दिवस कोणतंही चलान नाही, पालकमंत्र्यांनी दिली माहिती