नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency) अस्थिरतेचा पर्याय बनवता येऊ शकते. कारण यामध्ये एका रात्रीत गुंतवणुकदार एकतर श्रीमंत होतात किंवा कंगाल. सध्या काही क्रिप्टोकरन्सी आपल्या वाटचालीने सर्वांना आश्चर्यचकित करत आहेत. एका नवीन क्रिप्टोकरन्सीने (Cryptocurrency) सोमवारी ताबडतोब रिटर्न दिला आहे.
या करन्सीचे नाव शिह त्जु (Shih Tzu) आहे. या क्रिप्टोकरन्सीचे नाव चीनी वंशाच्या डॉग ब्रीडवर आहे. Shih Tzu टोकनमध्ये मागील दोन तासात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. इकनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सोमवारी या क्रिप्टोकरन्सीने (Cryptocurrency) सुमारे 6,00,000 पर्सेंंटची उसळी घेतली.
गुंतवणुकदारांना 59.99 लाख रुपयांचा फायदा
क्वॉईन मार्केट (Coinmarket cap) च्या आकड्यांनुसार, सोमवारी Shih Tzu टोकनमध्ये 2 तासातच 6 लाख टक्के तेजी दिसून आली. डिजिटल टोकन शिह त्जु खुपच कमी वेळात 0.000000009105 डॉलरवरून 0.00005477 डॉलरच्या स्तरावर पोहचले.
या डिजिटल टोकनमध्ये 1,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट अवघ्या 2 तासातच 60 लाख रुपयांत बदलली. एक्सचेंजमध्ये या डिजिटल टोकनचा व्हॉल्यूमसुद्धा 65 टक्केपर्यंत वाढला.
Crypto Fraud पासून वाचण्याचे उपाय
जस-जशी क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) मागणी वाढत आहे, तसतसे यामध्ये घोटाळे आणि फसवेगिरीच्या घटना वाढत आहेत. यासाठी कोणत्याही क्रिप्टोमध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी तिच्याबाबत पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोशल मीडियावर असंख्य बनावट क्रिप्टो एक्सचेंज आणि टोकन आहेत जे काही दिवसात श्रीमंत बनवण्याचे स्वप्न दाखवत आहेत. प्रत्येक तो गुंतवणुकदार आणि विना गुंतवणुकदार जे कमी वेळात जास्त नफा कमावणे किंवा श्रीमंत बनण्याच्या नादात आहेत, ते फसवणुक करणार्यांच्या निशाण्यावर असतात. कारण क्रिप्टोकरन्सीचा बिझनेस पूर्णपणे स्वतंत्र आहे. यावर सरकारचे नियंत्रण नाही किंवा कोणत्या बँकेचेही नियंत्रण नाही.
बनावट क्वाईन कसे ओळखावे
कोणत्याही क्वाईनची सत्यता ओळखण्यासाठी आपण हे पहावे की, ते कमी वेळात खुप जास्त रिटर्न देण्याचे अश्वासन देत आहेत का.
बनावट टोकन ओळखण्याची आणखी एक पद्धत ही आहे की,
जर क्रिप्टो स्वस्तात देण्याचे अश्वासन देणारे स्कॅमर हे गुंतवणुकदारांकडून बँक अकाऊंटच्या पडताळणीसाठी त्यांना काही क्वाईन पाठवण्यास सांगतात.
जर ते तुमच्या बँक खात्याची माहिती घेत असतील तर समजून जा की, क्वाईन पूर्णपणे बनावट आहे.
तज्ज्ञ सांगतात की, काही हॅकर्स दिग्गजांचे सोशल मीडिया पेज हॅक करून त्यांच्या
माध्यमातून एखाद्या विशेष क्रिप्टोत ताबडतोब नफा देण्याचे अश्वासन देतात. अशाप्रकरच्या दाव्यांपासून सावध रहा.
डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)
Web Title :- Cryptocurrency | dog based crypto token shih tzu makes rs 1000 into rs 60 lakh within 2 hours check how.
Multibagger Stock | कृषी संबंधीत ‘या’ कंपनीच्या शेयरने 1 वर्षात 1 लाखाचे बनवले 3.14 कोटी रुपये