नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय राखीव पोलीस दलाने हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी अर्ज मागवले असून पुरुष/ महिला कॉन्स्टेबल या (जनरल ड्युटी/ बुग्लर/ माळी) या १४१२ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ५ मार्च २०२० ही शेवटची तारीख असल्याने इच्छुक तातडीने अर्ज दाखल करू शकतात. त्यासाठी तुम्ही विभागाच्या वेबसाईट crpf.gov.in वर अर्ज करू शकता.
पुरुषांसाठी पद :
सामान्य वर्ग -१०३१
अनुसूचित जाती वर्ग – २००
एसटी वर्ग – महिलांसाठी १०० पदे
सामान्य वर्ग – ६३
अनुसूचित जाती वर्ग – १२
वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असावी. अर्ज करणाऱ्यांचे कमाल वय ३२ वर्षे असावे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज ५ मार्च २०२० असून या पदांचे वेतनमान २५,५०० ते ८१,१०० रु. असेल.
निवड पद्धती-
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल मेजरमेंट, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, टेस्टिमोनियल टेस्ट , वैद्यकीय चाचणी आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना LDCE कोर्समध्ये जावे लागेल आणि त्यांना दोन वर्षांच्या प्रोबेशन पीरियडमध्ये रहावे लागेल.