पुणे : बहुजननामा ऑनलाईन – रेमडेसिविरचा काळा बाजार करुन जादा दराने विक्री केल्याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या नातेवाईकांकडून पार्टी घेऊन या पार्टीत तरूणीशी अश्लिल वर्तन करणार्या गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या निलंबित उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक माने असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
दीपक माने हा गुन्हे शाखेच्या युनिट ४ मध्ये सध्या कार्यरत होता. पोलीस आयुक्तांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी १० पथके तयार केली आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने बालेवाडी परिसरात दोघा भावांना इंजेक्शनसह पकडले होते. तपासादरम्यान, माने याची आरोपीच्या नातेवाईकांशी ओळख झाली. माने हा २० एप्रिल रोजी आरोपींच्या नातेवाईकांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याने मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत त्याने तरूणीशी अश्लिल वर्तन करुन तिची छेडछाड केली. पोलिस उपनिरीक्षक मानेने 21 वर्षीय तरूणीशी अश्लील वर्तन केले तसेच तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावुन तिच्या मनास लज्जा उत्पनन केली. मानेने तक्रारदार तरूणीच्या 16 वर्षीय बोलावून तिचा हात धरून तिला जवळ ओढले अन् तिच्या छातीस दाबले. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली.
याबाबत एका महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने दीपक माने याला तातडीने निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी पोक्सो तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.