इंदूर न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी पुण्यात दोघांमधील वादानंतर डॉक्टर दाम्पत्यापैकी महिलेने आधी गळफास घेऊन आत्महत्या (Crime News) केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतीचा मृतदेहही घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती इंदूरमध्ये घडली आहे. दोघानंदमध्ये झालेल्या वादातून प्रियसीने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. त्यानंतर प्रियसीच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्याने प्रियकरानं ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या (Crime News) केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रेल्वे ट्रॅकजवळ शुक्रवारी दुपारी तरुणाचा मृतदेह सापडला. एका खासगी कंपनीत मार्केटिंगचं देवेंद्र (२५ ) काम करत होता. त्याचे रविदास नगर येथे राहणाऱ्या काजल कोटवालशी प्रेमसंबंध होते.
काही कारणांमुळे दोघामंध्ये दोन दिवसांपूर्वी भांडण झाले.
त्यानंतर काजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हि बातमी समजताच देवेंद्रने शुक्रवारी दुपारी ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली.
देवेंद्रच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून देवेंद्र आणि काजल यांचे प्रेमसंबंध होते.
काजल पीएससीची तयारी करीत होती. काजलच्या भावाने काही दिवसांपूर्वी देवेंद्रला बहिणीसोबत राहू नको असं सांगितलं. यानंतरही दोघेही लपून -छपून भेट होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काजलला दुसऱ्या तरुणासोबत बोलताना देवेंद्रने पाहिलं होतं.
त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. गुरुवारी रात्री उशिरा दोघे फोनवर बोलत होते.
त्यानंतर काही कारणामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला अन काजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Title : Crime News | repetition of incident that shock pune body of the boyfriends was found after the suicide of girlfriend
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune News | वंचितांच्या विकासासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता विलास चाफेकर यांचे निधन