याबाबत अधिक माहिती अशी, सहाय्यक उपनिरीक्षक राजकुमार (ASI Rajkumar) आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार (Police Constable Jitendra Kumar) यांनी एका प्रकरणात एक विवाहित महिला आणि तिच्या आईवडिलांना अटक (Arrested) केली होती. त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवलं. तसेच त्यांच्याकडून अनेक कामे करुन घेतली. त्यांना स्वयंपाक करायला लावला आणि भांडीही घासून घेतली धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एकही महिला पोलीस उपस्थित नव्हती. अशात कायदेशीर बाबीला धुडकावत महिलेला पोलिसांनी डांबून ठेवले. यानंतर हे दोन्ही पोलीस अधिकारी महिला आणि तिच्या आई वडिलांना घेऊन 2 दिवस गुजरातच्या विविध भागात फिरत राहिले. (pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस कॉन्स्टेबलने महिलेवर बलात्कार (Attempted Rape) करण्याचाही प्रयत्न केला. आईवडिलांना वेगळ्या खोलीत ठेवून महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु, तरुणीच्या आईने आरडाओरडा करत मध्यस्थी करून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेबाबत समजताच तेथील गावक-यांनी पोलीस ठाण्यात (Police station) फोन करून याला आक्षेप घेतला. महिला पोलीस नसताना महिलेला रात्रभर ठाण्यात कसं ठेवलं? असा जाब विचारताच दोन्ही पोलीस अधिकारी घाबरले आणि शहर सोडून पळ काढला.
दरम्यान, सहाय्यक उपनिरीक्षक राजकुमार (ASI Rajkumar) आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार (Police Constable Jitendra Kumar) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, जितेंद्र कुमारला निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशी डीएसपी पातळीवरून करण्यात येत आहे.
Web Title :- Crime News | police constable tried to rape a woman in police station
Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले
Ajit Pawar | ‘संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही’ – अजित पवार