मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याला बलात्काराच्या आरोपाखाली मुंबईत अटक करण्यात आली आहे. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी सतीश वैद्य नावाच्या मनसे कार्यकर्त्यावर बलात्कार, हिंसाचार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ज्या महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे ती देखील मनसेची कार्यकर्ता आहे. सदर पीडित महिलेनं टिळकनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सतीश वैद्य हा चेंबूरमधील मनसेचा कार्यकर्ता आहे.
महिलेने केला गंभीर आरोप
सतीश वैद्यने आपल्याला ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्याच्या बहाण्याने नेलं आणि तिथे बलात्कार केला. असा गंभीर आरोप करत महिलेनं असंही म्हटलं आहे की, सतीशने तिला धमकावलं आहे. जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर पतीला सर्व प्रकार सांगू अशी धमकी देत सतीशने आपल्याला ब्लॅकमेल केलं असंही महिलेनं पोलिसांना सांगितलं. महिलेच्या या आरोपानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. दोघेही मनसेचेच कार्यकर्ते आहेत.
Visit : bahujannama.com