Crime News | छापेमारीत चिरडले गेल्याने चार दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू; 6 पोलिसांवर गुन्हा दाखल; 5 पोलीस निलंबित

Crime News | 4 days old infant dies after police crushed him under boots during raid in giridih

बहुजननामा ऑनलाईन – Crime News | झारखंडमधील गिरीडिह जिल्ह्यात एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. आरोपीच्या घरात छापेमारी करताना पोलिसांच्या बुटांच्या खाली चिरडल्याने चार दिचसांच्या अर्भकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच पोलिसांना निलंबित देखील करण्यात आले आहे. (Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गिरीडिहचे पोलीस अधीक्षक अमित रेणू यांनी दिलेल्या माहितीनूसार , देवरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कोशोडिंगी गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी दोन आरोपिंना अटक करण्यासाठी एक घरात गेले होते. या दरम्यान पोलिसांच्या बुटाच्या खाली चिरडले गेल्याने चार दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मात्र बाळाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळल्या नाहीत. ज्या आरोपींना पकडायला पोलीस गेले होते त्यातील एक आरोपी बाळाचा आजोबा आहे. (Crime News)

 

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अर्भकाच्या अंतर्गत अवयवांना धक्का पोहचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आली. देवरी पोलीस ठाण्यातील संगम पाठक आणि एस. के. मंडल या दोन अधिकार्यांसह सहा पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.

 

 

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान आरोपी भूषण पांडे याचा एक व्हिडीओ वायरल झालायं ज्यात त्याने म्हटले आहे की,
‘पहाटे पोलीस आल्यावर मी पळून गेलो. माझ्या कुटुंबातील इतर सदस्य ही बाहेर गेले.
माझा चार दिवसांचा नातू बेडवर झोपला होता. पोलीस मला शोधत बेडपाशी आले आणि त्यांनी बाळाला चिरडले.
नंतर माझे कुटुंबिय जेव्हा आले तेव्हा त्यांना बाळ मृतावस्थेत दिसले.’ झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी
हा व्हिडिओ ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Crime News | 4 days old infant dies after police crushed him under boots during raid in giridih

 

हे देखील वाचा :

Congress Mohan Joshi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी

Coronavirus Cases In India | सावधान ! देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायेत; 24 तासात 1300 नव्या रूग्णांची नोंद, तिघांचा मृत्यू

Ajit Pawar | ‘जोडे मारण्याची पद्धत सुरु झाली, तर…’, सत्ताधारी आमदारांच्या कृतीवरुन अजित पवार सभागृहात आक्रमक