नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटण्यासाठी मुंबईत येत असत, असा दावा केला होता. तसेच ते म्हणाले की, एक काळ असा होता की दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि शरद शेट्टी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून निर्णय घ्यायचे. पण आता मात्र त्यांची इथे काहीही किंमत नाही.
अब्दुल करीम शेख खान असे करीम लाला यांचे नाव असून त्यांचा जन्म अफगाणिस्तानच्या कुर्न प्रातांत १९११ मध्ये झाला होता. त्याला पश्तून समुदायाचा शेवटचा राजाही म्हटले जाते. त्यांचे कुटुंब समृद्ध असून व्यवसाय करणाऱ्या घरदार होते. यश मिळवण्याच्या हेतूने त्यांनी प्रेरित होऊन भारतात येण्याचा निर्णय घेतला.
हाजी मस्तान मिर्झा यांना मुंबईत अंडरवर्ल्डचा पहिला डॉन म्हटले जात असले तरी पहिला माफिया डॉन करीम लाला असल्याचे सांगितले जाते. स्वतः हाजी मस्तान हेही त्याला डॉन म्हणायचे. मुंबईत तस्करी आणि अवैध व्यवसायांमध्ये त्याचे नाव होते. तो गरजू आणि गोरगरिबांना मदत करायचा, असे सांगितले जाते.
करीम याने २१ व्या वर्षी भारतात येण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानच्या पेशावर शहरातून मुंबईत येण्याचा मार्ग गाठला. मुंबईत आल्यावर त्यांनी दिखाव्यासाठी व्यवसाय तर सुरु केला. पण प्रत्यक्षात मात्र ते मुंबई डॉकमधून हिरे आणि रत्नांची तस्करी सुरु केली होती. १९४० पर्यंत त्यांनी या कामात चांगला जम बसवला. या व्यवसायात त्यांना चांगला फायदाही होत होता.