रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – मुरुड (ता. दापोली) येथील पोस्टमास्तर महिलेने पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दापोली पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली आहे. पीर्वी सुशील तुरे (वय २५, रा. मुरुड-दापोली) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पूर्वी यांनी पती सुशील तुरे यांना पोस्टाचे पैसे देवाणघेवाण करण्याचे मशिन दाखविण्यासाठी दापोली पोस्ट कार्यालयात जात असल्याचे सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या; मात्र त्या दापोली येथे न जाता मुरुड पोस्ट कार्यालयात आल्या व त्यांनी पोस्ट कार्यालयातील लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रात्री साडेदहा वाजता उघड झाला. या प्रकाराची खबर त्यांचे पती सुशील तुरे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. हेडकॉन्स्टेबल मोहन कांबळे पुढील तपास करत आहेत.