नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा ऑलराउंडर युसूफ पठाणने आंतरराष्ट्रीय आणि घरगुती खेळातून संन्यास घेतला आहे. या जबरदस्त फलंदाजाने आतापर्यंत 57 एकदिवसीय सामने खेळले ज्यात 810 धावा केल्या आहेत. तर 22 टी -20 सामन्यात 236 धावा केल्या आहेत. यूसुफ पठाणने 2 वनडे शतके आणि 3 अर्धशतकेही फटकावली आहेत. यासोबतच 33 एकदिवसीय आणि 13 टी -20 विकेटही त्याच्या नावावर आहेत.
राईट हँडेड युसूफ पठाणने शक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून सेवानिवृत्तीची घोषणा केली. भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत त्याने लिहिले कि, ‘मला आठवतेय ज्या दिवशी मी पहिल्यांदा भारताची जर्सी घातली होती. केवळ मी एकट्यानेच जर्सी घातली नव्हती, माझ्या कुटुंबाने, कोच, मित्र आणि पूर्ण देशाने ती जर्सी घातली होती. माझे बालपण, जीवन क्रिकेटच्याच आसपास गेले. मी आंतरराष्ट्रीय, घरगुती आणि आयपीएल क्रिकेट खेळलो. पण आज काही वेगळेच आहे. आज कोणताही वर्ल्ड कप किंवा आयपीएलचा अंतिम सामना नाही, परंतु तो तितकाच महत्वाचा दिवस आहे. आज क्रिकेटपटू म्हणून माझ्या कारकीर्दवर पूर्णविराम लागत आहे. मी माझ्या सेवानिवृत्तीची अधिकृतपणे घोषणा करतो.
I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021
… हे दोन विशेष क्षण
युसुफ पठाण यांनी आपल्या पोस्टमध्ये दोन विश्वचषक जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन मैदानावर राउंड मारणाऱ्या क्षणाला आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण म्हणून वर्णन केले. दरम्यान, युसुफ पठाण 2007 चा टी -20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कप 2011 जिंकणार्या संघाचा सदस्य होता. युसुफ पठाणने लिहिले की त्यानेआंतरराष्ट्रीय डेब्यू एमएस धोनी, आयपीएल डेब्यू शेन वॉर्न आणि देशांतर्गत क्रिकेटमधील डेब्यू जेकब मार्टिन यांच्या नेतृत्वात केले. पठाण यांनी आपल्या तीन कर्णधारांचे आभार मानले. तसेच, युसुफ पठाणने केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरचे देखील आभार मानले, ज्याच्या नेतृत्वात केकेआर संघ दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनला.
युसूफ पठाणची कारकीर्द
युसुफ पठाणने 100 फस्ट क्लास मॅचमध्ये 34.46 च्या सरासरीने 4825 रन केले. ज्यात त्याने 11 शतके ठोकली. युसुफने 199 लिस्ट ए आणि 274 टी -20 सामने देखील खेळले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने टी -20 मध्ये 9 शतके आणि टी20 मध्ये एक शतकही झळकावले. युसूफ पठाणच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे झाल्यास या फलंदाजाने 174 सामन्यात 3204 धावा केल्या, त्यामध्ये त्याने 13 अर्धशतक आणि एक शतक ठोकले. दरम्यान, युसुफच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याच्या संपूर्ण कामगिरीचे कौतुक केले तर काहींनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या