मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी असून पुन्हा एकदा आता सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या जोडीला खेळताना बघू शकता. हे दोन दिग्गज ज्या संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत त्या संघाची कमान वेस्टइंडिजचा मोठा फलंदाज ब्रायन लारा याच्याकडे असणार आहे. या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये एकूण ११ सामने खेळले जाणार असून त्याची सुरुवात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या संघाच्या सामान्याने होणार आहे.
सचिन तेंडुलकरची टीम इंडिया लीजेंड्स आणि ब्रायन लारा यांची टीम वेस्टइंडिज लीजेंड्स यांच्यामधील सामना ७ मार्चला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. गुरुवारी या सीरिजचे नियोजन सादर केले आहे. या सीरिजचे कमिश्नर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर असून ही मॅच संध्याकाळी सात वाजता सुरु होईल.
या सीरिजमधेय वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणार असून टूर्नामेंटमध्ये सहा टीम भाग घेणार आहेत. यांच्यात इंडिया लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, साउथ आफ्रिका लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स आणि वेस्टइंडीज लीजेंड्स यांचा सहभाग आहे. टूर्नामेंट मध्ये १० लीग मॅच होणार असून ज्यात सगळ्या टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यानंतर दोन सर्वोच्च संघात फायनल मॅच होईल.
यामधील दोन मॅच वानखेडे स्टेडियम, चार मॅच पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघ स्टेडियम, चार मॅच नवी मुंबईच्या महाराष्ट्र क्रिकेट संघ स्टेडियमवर आणि फायनल मॅच मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर २२ मार्च रोजी होणार आहे.