बहुजननामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आता क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. अशी बातमी सोशल मिडीयावर वाऱ्यासाखी पसरली आहे की, धोनी आज केव्हाही क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा करु शकतो. सोशल मिडीयावर लोक ट्विटद्वारे घोषणा करत आहेत की, आज सांयकाळी सात वाजता धोनी निवृत्तीसाठी पत्रकार परिषद घेऊ शकतो.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटनंतर धोनीच्या निवृत्तीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. विराट कोहलीने गुरुवारी (ता.१२) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक चित्र ट्विट केले, ज्यामध्ये तो धोनीला नमस्कार घालताना दिसत आहे. त्याने लिहिले की, ‘मी हा सामना कधीही विसरणार नाही. विशेष रात्र. या व्यक्तीने मला फिटनेस टेस्टसारखे पळविले आहे. विराट कोहलीच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी अंदाज वर्तविला आहे की, एम. एस धोनी आज सेवानिवृत्तीची घोषणा करू शकतो. कारण कोहलीने पोस्ट केलेल्या या फोटोतील सामना आज खेळला गेला नव्हता. त्याचबरोबर धोनीने आजच्या दिवशी असे कोणतेही काम केले नव्हते ज्यामुळे कोहलीला त्याची आठवण येईल.
धोनीची कारकिर्द पाहता तो अचानक त्याचे मोठे निर्णय घेतो. त्याचे हे निर्णय मात्र त्याच्या चाहत्यांना हादरवून टाकणारे असतात. २०१४-१५ मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया दौर्याच्या मधोमध कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय त्याने घेतला होता. यानंतर, २०१७ मध्ये, एमएस धोनीने लिमिटेड ओव्हर फॉर्मेटचे कर्णधारपदही अचानक सोडण्याचा निर्णय घेतला. तर, इंग्लंड दौर्यापूर्वी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर विराट कोहलीने संघाचा ताबा घेतला.
https://twitter.com/imVkohli/status/1172023600649359361?s=19