लाहोर : वृत्त संस्था – पाकिस्तान क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू अब्दुल कादिर यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. उत्कृष्ट ‘स्पिनर’ या नावाने ते जगभर ओळखले जात होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
१५ सप्टेंबर १९५५ मध्ये लाहोरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधल्या त्यांच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत ६७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले होते. त्यांनी एकूण कसोटी सामन्यात २३६ तर एकदिवसीय सामन्यात १३२ विकेट घेतल्या होत्या. तर ५ एकदिवसीय सामन्यात त्यांनी पाकिस्तानी कर्णधार पदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. निवृत्तीनंतर ते समालोचक झाले. ते पाकिस्तानी निवड संघाचे अध्यक्षही होते. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डा ने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय.
इंग्लंडच्या संघाच्या विरोधात कादिर यांनी कायम उत्तम प्रदर्शन केलं. १९८७ मध्ये पाकिस्तानात झालेल्या टेस्ट सामन्यांमध्ये त्यांनी ३० विकेट घेतल्या होत्या. १९८० च्या दशकात पाकिस्तानी संघाच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता. अनेक मोठ्या खेळाडू त्यांच्या बॉल स्पिन करण्याच्या पद्धतीला घाबरत असे. त्यांनी शेन वॉर्न आणि मुश्ताक अहमद यांच्या सारख्या दिग्गज बॉलरलाही त्यांनी मागे टाकले होते . ते दोन पद्धतीने ‘गुगली’ टाकत होते असंही म्हटलं जात होतं. त्यांच्या बॉलिंगच्या कौशल्यामुळे त्यांना ‘डान्सिंग बॉलर’ असंही म्हटलं जातं असे.
त्याच्या करियरमध्ये इम्रान खान यांचा मोठा वाटा होता. सामन्यांमध्ये त्यांनी ५६ रन्स देत ९ विकेट घेतल्या होत्या. कादीर यांनी १९८३ आणि १९८७ असे दोन वर्ल्ड कप खेळले होते.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत