बहुजननामा ऑनलाइन – रविवारी आयपीएल 2020 च्या अतिशय रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) ला पंजाब किंग्स इलेव्हन (Punjab kings Xi) च्या विरुद्ध विजय मिळाला. 20-20 षटकांत सामना टाय झाला. यानंतर सामन्याचा निर्णय सुपर ओव्हर मध्ये झाला. जिथे दिल्लीचा संघ जिंकला. पण दिल्लीच्या विजयावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक माजी क्रिकेट दिग्गज आणि चाहते आरोप करीत आहेत की, अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे पंजाबच्या टीमने हा सामना गमावला. कारण अंपायरने पंजाबच्या एका धाव ला शॉर्ट रन म्हणून सांगितले. परंतु स्लो मोशन रिप्लेमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की ही धाव शॉर्ट नव्हती.
अंपायर कडून कुठे आणि कशी चूक झाली?
पंजाबसमोर विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य होते. पंजाबला शेवटच्या 10 चेंडूत जिंकण्यासाठी 21 धावा कराव्या लागत होत्या. मयंक अग्रवाल ज्या पद्धतीने फलंदाजी करीत होते त्यावरून पंजाबचा विजय निश्चित दिसत होता. रबाडा 19 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. अग्रवालने त्याच्या दुसर्या बॉलवर जोरदार चौकार लगावला. रबाडाचा पुढचा चेंडू यॉर्कर होता. त्यावर अग्रवालने मिडऑनच्या दिशेने खेळून दोन धावा पूर्ण केल्या. ख्रिस जॉर्डन दुसर्या बाजूने फलंदाजी करीत होते. परंतु पंच नितीन मेननने त्यास शॉर्ट रन म्हटले. दुसर्या अंपायरशी बोलताना ते म्हणाले की जॉर्डनने पहिली धाव पूर्ण करताना बॅट क्रीजच्या आत ठेवली नाही. अशा परिस्थितीत पंजाबला येथे फक्त 1 धावा देण्यात आली. जॉर्डनचा हा शॉर्ट रन नव्हता हे टीव्हीच्या स्लो मोशन रीप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते. त्यांनी बॅट व्यवस्थित ठेवली होती. परिणामी एक धाव कमी असल्याने सामना टाय झाला.
One short that wasn’t. Technology must take over in these cases…..but that’s possible if only the third umpire spotted it in time. What if #KXIP don’t make it to the final four by 2 points?? Tight #IPL2020 is likely to be… https://t.co/juCLU375jg
— Aakash Chopra (@cricketaakash) September 20, 2020
अंपायरच्या या चुकीवर वीरेंद्र सेहवाग भडकले. सेहवाग हे पंजाबचे कोच देखील राहिलेले आहेत. अंपायरच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले, ‘मॅन ऑफ द मॅच निवडीशी मी सहमत नाही. मॅन ऑफ द मॅच चे खरे दावेदार हे अंपायर आहेत. तो शॉर्ट रन नव्हता. या फरकाने पंजाबच्या संघाने सामना गमावला.’
I don’t agree with the man of the match choice . The umpire who gave this short run should have been man of the match.
Short Run nahin tha. And that was the difference. #DCvKXIP pic.twitter.com/7u7KKJXCLb— Virender Sehwag (@virendersehwag) September 20, 2020
सामन्याचा निकाल
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटलने 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाब संघही 157 धावाच करू शकला. सामना सुपर ओव्हर मध्ये गेला, तिथे कागिसो रबाडाने पंजाबचा डाव अवघ्या 3 चेंडूंत गुंडाळला. सुपर षटकात विजयासाठी पंजाबने दिल्लीला अवघ्या 3 धावांचे लक्ष्य दिले, जे त्यांनी 2 चेंडूंतच मिळवले.