Creative Foundation Pune | “बहिणींच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही” – ना. मुरलीधर मोहोळ
क्रिएटिव्ह फाऊंडेशन तर्फे आंगणवाडी साठी उपयुक्त साहित्य देऊन ओवाळणी – संदीप खर्डेकर.
Creative Foundation Pune | बहिणींच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही, आज आंगणवाडी सेविकांनी मला राखी बांधून मायेच्या धाग्यात बांधले असल्याचे ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी भावनिक क्षण असल्याची भावना देखील मा. ना. मुरलीधरअण्णा मोहोळ यांनी व्यक्त केली.बहीण भावाचे नाते हे पवित्र नातं असून ही आपली परंपरा आहे संस्कृती आहे असेही ते म्हणाले.
आज क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे आंगणवाडी सेविकांसोबत “अण्णांच्या” घरी जाऊन रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, विविध आंगणवाडीतील सेविका शिक्षिका सुरेखाताई होले ,जया काळे,उषा आवळे,विद्या भरेकर,सुनिता मुटकुळे,संगिताताई वांद्रे, मीनाताई कोंडे,मेघना ववले,संध्याताई खळदकर इ उपस्थित होत्या.
ह्या भगिनींनी ओवाळणी म्हणून आंगणवाडीतील बालकांना उपयुक्त साहित्य द्यावे अशी विनंती केली होती, त्यास अनुसरून ह्या नऊ आंगणवाडीतील बालकांसाठी वजनकाटा व उंची मोजण्याचे उपकरण भेट देण्यात आले असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
तसेच येणाऱ्या काळात त्यांना मागणीनुसार आवश्यक साहित्य पुरविण्यात येईल असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले. ना. मुरलीधरअण्णा मोहोळ यांनी व्यस्त दिनक्रमातून सेविकांसाठी वेळ काढल्याबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व सर्व सेविकांनी कृतज्ञता व्यक्त केली. मुरलीधरअण्णा मोहोळ यांनी आम्हाला राखी बांधण्याचा मान दिला हे आमच्यासाठी खूप भाग्याचा प्रसंग असल्याचे सुरेखाताई होले व विद्याताई भरेकर म्हणाल्या.



Comments are closed.