मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सेंट्रल पब्लिक सेक्टर एन्टरप्राइज एक्सचेंज ट्रेडेड फंड अंतर्गत फर्दर फंड ऑफर रिटेल गुंतवणूकदारांसाठी 31 जानेवारीला खुली करण्यात येणार आहे. ईटीएफ हा एक प्रकारचा म्यूच्युअल फंड आहे. ज्याचे युनिट्स तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विक्री करू शकता. हा फंड हाउसकडून ट्रेडिंग अकाऊंटद्वारे खरेदी किंवा विक्री करतात. मार्च 2014मध्ये लॉन्च झाल्यानंतर सीपीएसआय ईटीएफचा हा सातवा ट्रांच आहे.
या मध्ये आहेत 12 सरकारी कंपन्या
सीपीएसआय ईटीएफमध्ये 12 पब्लिक सेक्टर कंपन्या सहभागी आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक वीज आणि पॉवर सेक्टरमधील कंपन्या आहेत. 23 जानेवारीपर्यंत झालेल्या एक, तीन आणि पाच वर्षात यांचा कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट अनुक्रमे -6.36 टक्के, -6.35 टक्के आणि -2.59 टक्के राहिला आहे. यामध्ये ओएनजीसी, एनटीपीसी, कोल इंडिया, इंडियन ऑईल, आरईसी, पीएफसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ऑयल इंडिया, एनबीसीसी इंडिया, एनएलसी इंडिया आणि एसजेव्हीएन सारख्या कंपन्या सहभागी आहेत. या कंपन्यांना इंडेक्समध्ये 20 टक्केपर्यंत वेटेज आहे.
मिळेल 3 टक्के डिस्काऊंट
प्रत्येक सीपीएसई ट्रांच डिस्काउंटसोबत येतो, जो रिटेल गुंतवणूकदारांसाठी 3-5 टक्क्यांच्या जवळपास असतो. सध्या या सातव्या ट्रांचसाठी गुंतवणूकदारांना 3 टक्के डिस्काउंट मिळेल. हे डिस्काउंट रेफरन्स प्राईजच्या आधारावर असेल. या डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संस्था गुंतवणुकदारच गुंतवणूक करतात.
ग्रीनशूचा सुद्धा पर्याय उपलब्ध
यास सीपीएसई ईटीएफ निप्पॉन लाइफ इंडिया अॅसेट मॅनेजमेंट कंपनी मॅनेज करत आहे. अँकर इन्वेस्टर्ससाठी यास गुरूवारी खुले करण्यात येईल. याच्या एक दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी रिटेल इन्वेस्टर्ससाठी खुले करण्यात येईल. 6 एफएफओ किवा सातव्या ट्रांचसाठी आधार प्राईज 10 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. जर याचे ओव्हरसबक्रिप्शन झाले तर यासाठी ग्रीनशूचा सुद्धा पर्याय आहे.
Visit : bahujannama.com