नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसपासून बचावासाठी थोड्या-थोड्या वेळाने हात धुणे, योग्य सॅनिटायझरचा वापर, गर्दीपासून बचाव करण्याचे आदेश दिले जात आहेत. पण यादरम्यान एक वस्तू आहे जिच्या साफ-सफाईवर आपले क्वचितच लक्ष जाते, ते म्हणजे आपला मोबाईल. अशात तुम्हाला तुमचा मोबाईलपासूनही कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे.
सार्स कोरोना व्हायरसच्या डेटा कलेक्शन दरम्यान सांगितले आहे कि ग्लास स्लाईडवर हा व्हायरस ९६ तास राहू शकतो, जो फोन स्क्रीनवरही असतो. मायक्रोबायोलॉजिस्ट Emma Hayhurst यांचे म्हणणे आहे की, या गोष्टीला कोणताही पुरावा नाही कि फोनद्वारे हा व्हायरस पसरू शकतो. पण फोनमधून हा व्हायरस येत नाही याही गोष्टीचा काही पुरावा नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला फोन साफ करायचा असेल आणि विषाणूंपासून लांब ठेवायचे असेल तर अशाप्रकारे तुम्ही साफ करू शकता…
– सर्वात पहिले लक्षात ठेवा कि आपला फोन अनप्लग आहे आणि त्यावर कव्हर लावले आहे.
– मायक्रोफायबर कपड्याला ओले करा आणि मऊ साबणाचा वापर करा. लक्षात ठेवा कि साबण सरळ फोनवर लावायचे नसून त्याला पाण्यात मिक्स करायचे आहे. आता त्याने फोनला पुसून घ्या.
– जरी तुमचा फोन वॉटरप्रूफ असेल तरी लक्षात ठेवा कि कोणत्याही भागावर पाणी लागणार नाही. यामुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो.
– आपल्या फोनला कोणत्याही क्लिनरमध्ये टाकण्याची चूक करू नका.
– फोनला ब्लिच करू नका.
– टिशु पेपरचा वापर करू नका. त्याने फोनच्या स्क्रीनला नुकसान होऊ शकते.
– कोणत्याही प्रकारचा स्प्रे वापरू नका. तो फोनच्या कोणत्याही भागात जाऊ शकतो.
– फोन कंपन्या म्हणतात कि फोन साफ करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करू नका आणि फक्त मायक्रोफायबर कापडही वापरू नका.